सोमाटणे:
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याच्या भावना अर्थउन्नति अर्बन निधि लि बँकच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या.
तळागाळातील  घटकाच्या आर्थिक, सामाजिक व अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेला प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न म्हणजेच   अर्थउन्नति अर्बन निधि लि बँकचे मुख्य डायरेक्टर हे मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदाय भूषण ह भ प अक्षय महाराज येवले  आणि त्यांच्या सौभाग्यवती कीर्तनकार ह भ प जयश्रीताई अक्षय येवले आहेत,येवले दाम्पत्यांच्या या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचा अभिमान पाचाणे पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केला.
अर्थउन्नति अर्बन निधि लि या बँकेचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार श्रीरंग बारणे तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि स्टार प्रवाह वरील मुरंबा मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री निशाणी बोरुले म्हणजेच रेवा व  अध्यात्मिक क्षेत्रातील श्री श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री ह भ प कृष्णा महाराज परेराव वराजकीय,सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितीत संपन्न झाला.
  अर्थ उन्नती अर्बन निधी लिमिटेड बँकेचे डायरेक्टर ह भ प श्री अक्षय महाराज येवले यांनी बँकेची माहिती देताना बँकेची मुख्य ध्येय हे सर्वसामान्य ग्राहकांना कुटुंबांना आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना जबाबदार वित्तीय सेवा आणि उपाय प्रदान करून शाश्वस विकासात योगदान देणेही आहे असे सांगितले.
  यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर अन्य मान्यवर उपस्थित होते.
    अक्षय येवले  महाराज म्हणाले ,”ही बँक आमच्यासाठी केवळ एक बँक नाही तर हे एक व्हिजन आणि मिशन आहे. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारी असलेली ही बँक सामान्य माणसाने सामान्य माणसांसाठी केलेली बँक आहे.आणि या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे सेवा  आहे. आपण सर्वानी  एकत्र येऊन एकत्र विकासात्मक काम करावे.
  माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी निधी बँक कशी उभे राहते याचे सविस्तर माहिती देऊन ह भ प डायरेक्टर अक्षय महाराज येवले यांच्या कामाचे  कौतुक केले .अक्षय  महाराजांनी उचललेले पाऊल हे अत्यंत अवघड आहे. मात्र महाराजांच्या विचारांमध्ये सेवाभाव असल्यामुळे निश्चितपणाने या बँकेच्या माध्यमातून लोकांची चांगली सेवा घडेल, रोजगार निर्मिती होईल,अनेक तरुणांना या बँकेच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल या बँकेसाठी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे साहेबांनी भरभरून शुभेच्छा दिल्या
   ह भ प युवा कीर्तनकार जयश्रीताई येवले यांनी सर्व उपस्थित जनतेचे आभार व्यक्त केले. आभार मानत असताना महाराजांनी श्री संत तुकोबारायांचा अभंग उच्चारलाजोडोनिया धन उत्तम व्यवहारे| उदास विचारे वेच करी||
त्या म्हणाल्या,”  जीवन जगत असताना आज मुख्य गरज आहे तो म्हणजे पैसा .हीच गरज लक्षात घेऊन सर्वसामान्यांची अर्थ उन्नती व्हावी या हेतूने आम्ही अर्थ उन्नती अर्बन निधी बँकेकडे वाटचाल सुरू केली .जयश्रीताई येवले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!