बनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश :  राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी
तळेगाव दाभाडे:
बनावट देशी दारू निर्मिती करणारा   कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा  राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाने  पर्दाफाश केला. नाणेकरवाडी गाव हददीत गोकुळ सोसायटीमध्ये ता.खेड जि.पुणे या ठिकाणी बनावट देशी मद्य निर्मिती व विक्री कारखान्यावर छापा टाकीत ही कामगिरी करण्यास आली.
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मुंबई, कांतीलाल उमाप, संचालक, लावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग  ए. बी. चासकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे  सी.बी. राजपूत, मा. उप-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे शहर  एस. आर. पाटील ,उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पिंपरी-चिंचवड शहर युवराज शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे, विभाग बीट क्र. १ पुणे च्या स्वाती भरणे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार नाणेकरवाडी गाव हददीत गोकुळ सोसायटीमध्ये ता.खेड जि.पुणे या ठिकाणी बनावट देशी मय निर्मिती व विक्री कारखान्यावर छापा टाकला.
या ठिकाणी आरोपीना हरीष ब्रजेशकुमार चंद्र वय २४ वर्ष, रा.नाणेकर वाडी, चाकण, ता.खेड जि.पुणे व राघवेंद्र यशवीर सिंह, वय-२० वर्षे, रा. नाणेकर वाडी. चाकण, ता.खेड जि.पुणे यांच्या ताब्यातून देशी दारु कॅन  १८० मिली क्षमतेचे ०७ बॉक्स देशी दारु टंगो पंच, १० मिली क्षमतेचे ३ बॉक्स, मॅकडॉल्स नं.-१ व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ५४ बाटल्या मदयाने भरलेल्या मिळून आल्या .
  देशी दारु टंगो पंच १८० मिली क्षमतेच्या रिकाम्या २५० बाटल्या देशी टंगो पंच १० मिली क्षमतेच्या ५०० बाटल्या, पाणी मिश्रीत मदयाची तोटी असलेली एक स्टॉलची टाकी त्यामध्ये अंदाजे १२  लीटर बनावट मदय मिळून आले. बनावट मदयाची निर्मिती करताना हेअर ड्रायर व वामनाचा उपयोग करत होते.
  बनावट मद्य या  बाटल्यामध्ये भरून ते पुन्हा सिल करताना त्याचे बुचे जशीच्या तशी पुन्हा बसवण्यात येत होती. आरोपी मुद्देमाल  ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता में छाबड़ा केंद्री लोकर च्या समोरील पत्राच्या शेडमध्ये वाह साजीद शेख यांच्या ताब्यातील देशी दारु ढंग पंच १८० मिली क्षमतेचे २५ याक्स देशी दारु गे पंच ९० मिलीचे २ बॉक्स असे एकून २७ मिळून आले.
  आरोपी वाहीद साजीद शेख यास ताब्यात घेवून अधिक तपास केला असता सदर बनावट मदय त्याने सुनिल राममूरत बिंद या इसमास विकले असल्याचे सांगितले सदर इनाणेकर वाडी वाडी कमान चाकण, ता.खेड जि.पुणे येथून त्याचे कब्जातील मुद्देमालासह अटक करून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ब) (ड) (क) (ई), ८१,८३,१०३ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १८४/२०२२ दि ०९/०९/२०२२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई एकून रु.२,१०,८१०/ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीना मे न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाई मध्ये निरीक्षक  सुनिल परले, डी.सी. जानराव व दुय्यम निरीक्षक,  एस.टी. भरणे,  डी.बी. सुपे,  एन. आर. मुजाल,  ए.पी. बने व सह. दु.नि. रवि लोखंडे, स्वनिल दरेकर, डी. बी. गवारी रसूल ,शिवाजी गळवे, राहुल नजाळ, रावसाहेब देवळे, गायकवाड, अतुल चारंगुळे, सोलंकेसमोर पड जवान सर्वश्री पुढील तपास श्रीमती एस. टी. भरणे, दुव्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी सहभाग घेतला.
दारू निर्मात्या कारखान्यावर पोलीसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.परंतू ग्रामीण भागात अशी दारू राजरोस पणे विकली जाते. अशा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचला जाणार का असा प्रश्न स्थानिक विचारात आहे.

error: Content is protected !!