कामशेत:
येथील महावीर हॉस्पिटल मध्ये धन्वंतरी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. केदारनाथची प्रतिकृती सादर करीत केलेल्या देखावा अधिक सुंदर व सुबक दिसत होता. गणेश भोकरे यांनी हा देखावा तयार केला होता. आरोग्यदायी या गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील सर्व स्तरातील नागरिकांना महाआरती साठी निमंत्रित करण्यात आले होते.
सर्वसमावेशक अशा या सोहळ्यात सणाचे पावित्र्य,धार्मिकता जपत समाजप्रबोधन आणि मदतीचा हात पुढे करण्यात आला. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्थीला विसर्जन करण्यात तेही पुढच्या वर्षी लवकर या अटीवर. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या कालावधीत महावीर हाॅस्पिटल लाडक्या बाप्पाच्या आगमनाने गजबजून केले होते.
डीजे व गुलालमुक्त मिरवणूकीत महावीरचा स्टाफ आनंदाने सहभागी झाला होता.
श्रींचे आगमन,महापूजा असे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यावर दर दिवशीच्या आरतीला महावीर हाॅस्पिटलने कामशेत शहरातील ग्रामपंचायतीचे  सफाई कामगार,शहरातील रुग्णवाहिका चालक, कामशेत शहरातील घरकाम करणा-या महिला,सरकारी अधिकारी,कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी,शहरातील वकील,डाॅक्टर,पत्रकार,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर्स,शहरातील किराणा,कापड,फर्निचर,इलेक्ट्रॉनिक्स,ज्वेलरी व्यापारी यांना दरदिवशी आरतीला सन्मानाने निमंत्रित करून यांच्या हस्ते गणरायाची महाआरती घेतली.कांचेनबेन कांतीलाल मुथा,कांतीलाल मुथा,निलेश मुथा,डाॅ.विकेश मुथा,परेश मुथा,मीना मुथा,ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा, माजी  सरपंच रोहिणी मुथा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महावीर हाॅस्पिटलच्या स्टाफने आरोग्य जागर करीत स्वच्छतेचा संदेश प्रबोधन करण्यात आले.
डाॅ.विकेश मुथा यांनी  गरजू रूग्णांवर सवलतीच्या दरात औषधोपचार मेडिक्लेम विमा विषयक जनजागृती केली. पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली. बुद्धीच्या या देवाची मनोभावे सेवा करताना गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देऊन त्या विद्यार्थ्यां मध्ये बाल गणेशाची रूपे पाहिल्याचे ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा यांनी सांगितले.
महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” हाॅस्पिटलच्या प्रांगणात धन्वंतरी गणरायाची मनोभावे सेवा केली. हे जग सुखी व्हावे आणि सर्वाना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे असे गणरायाच्या चरणी साकडे घातले.

error: Content is protected !!