समाज जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे: उद्योजक विलासराव काळोखे
तळेगाव दाभाडे :
येथील शिक्षक कॉलनीतील श्री. दत्त मंदिराच्या प्रांगणात शिक्षक दिनाचे औचित्य साधून विलास काळोखे मित्र परिवाराच्या वतीने  शिक्षक दिनाचे औचित्य साधून मावळ तालुक्याच्या विविध भागातील प्राथमिक, माध्यमिक विभागात ज्ञानदानाचे महत कार्य करणाऱ्या व तळेगावात वास्तव्यास असणाऱ्या ६५ गुरुजनांचा भव्य सन्मानचिन्ह , महावस्त्र देऊन ५ सप्टेंबर रोजी विलास काळोखे मित्र मंडळाच्या वतीने अतिशय देखण्या समारंभात “शिक्षक कार्य गौरव पुरस्कार” देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार गोपाळे गुरुजी होते
यावेळी काळोखे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की,शिक्षक हे राष्ट्राचे निर्माते असतात, कारण ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे असतात त्यासाठी त्यांचा सन्मान होणे गरजेचे असते
यावेळी रोटरीयन दिलीप भाई पारेख, कार्यक्रमाचे आयोजक विलासराव काळोखे, संजय मेहता, काशिनाथ निंबळे, सुहास काळोखे, संदीप पानसरे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तर विलास भेगडे, रेश्मा फडतरे, प्रसाद कुठे, केदार शिरसाट, दिनेश टाकवे, भारत काळे इतर पत्रकार बांधवांचा सदर प्रसंगी सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना गोपाळे गुरुजी म्हणाले की, शिक्षक केवळ शिक्षण देत नाहीत तर ते देशाचे भविष्य घडवतात तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक शिक्षक होते त्यांनी तत्त्वज्ञाना या विषयी डॉक्टरेट पदवी घेतली होती त्यांना यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांचा जीवन प्रवास व आजच्या शिक्षकांची कर्तव्य याविषयी  यांनी माहिती विशद केली. दिलीप पारेख म्हणाले की, आजचा शिक्षक हा खऱ्या अर्थाने देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकांमुळेच डॉक्टर, वकील ,इंजिनियर, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, समाजसेवक घडतात. अशा गुरुजनांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. 
सदर प्रसंगी काशिनाथ निंबळे, संजय मेहता यांनी शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या. तर सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रमोद बोराडे व प्रभावती काळे यांनी विलासरावांच्या  स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप पारेख यांनी केले तर सूत्रसंचालन माजी प्राचार्य भगवान शिंदे यांनी केले  तर आभार लक्ष्मण मखर यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन निनाद जोशी, रवी साबळे, प्रदीप कुडाळकर, सागर भालेराव, गणेश भोसले, रमेश शिंदे, प्रसाद शिंदे, प्रसाद भेगडे, विनोद टकले, विजय वरघडे अमोल जाधव, अक्षय करंडे, व विलास काळोखे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान याबद्दल विलास काळोखे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!