विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी किशोर आवारे यांच्या पुढाकाराने आवळे ते  तळेगाव बस सेवा  सुरू
तळेगाव स्टेशन:
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून ओवळे ते तळेगाव ही बस बंद झाल्यामुळे पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे ,आढले (बु), आढले (खू)  येथील सुमारे 60 ते 70 शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.
विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये आणि त्यांची गैरसोय कमी व्हावी यासाठी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी पुढाकार घेत अखेर एसटी बस पुन्हा सुरू करून घेतली. ही बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुसरी पर्याय व्यवस्था नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी पुसाणे गावचे सरपंच संजय आवंढे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुलाब वाजे यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली.
याची तत्काळ दखल घेत संजय आवंढे यांनी हा विषय जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या कानावर घातला किशोर आवारे यांनी तळेगाव एसटी डेपोशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ बस सेवा  पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केला.
  अखेर ही बस सेवा पूर्ववत झाली  असून शालेय विद्यार्थ्यांची रुग्णांची महिलांची तसेच कामगार वर्गाची मोठी अडचण सुटल्यामुळे समस्त गावकऱ्यांनी जनसेवा विकास समिती च्या किशोर आवारे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!