वडगाव मावळ:
मावळ तालुका भारतीय जनता पार्टी शासकीय योजना आघाडी अध्यक्षपदी  नाणे गावातील भाजपाचे युवा कार्यकर्ते रविंद्र प्रकाश आंद्रे  यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र  तालुकाध्यक्ष रविंद्र  भेगडे यांनी दिले.
यावेळी  माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,वडेश्वर गणाचे अध्यक्ष अरुण कुटे,मच्छिंद्र केदारी, अभिमन्यू शिंदे,सागर शिंदे, नामदेवराव वारिंगे,शशिकांत ठाकर, प्रविण शिंदे,विठ्ठल तुर्डे, तानाजी आंद्रे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना मावळ तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुन विशेषत: आदिवासी समाजातील बांधवांना लाभ देण्यासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र आंद्रे यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!