आमदार सुनिल शेळके यांनी पवन मावळातील गणेश मंडळांना भेटी देऊन एकोपा जपण्याचे केले आवाहन
वडगांव मावळ :
गणेश उत्सवानिमित्त आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी (दि.२) पवन मावळातील गावांमधील गणेश मंडळांना भेटी देत गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील एकोपा जपा असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर सातकर, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके यांनी गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पवन मावळमधील सोमाटणे,शिरगाव, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे, कुसगाव प.मा.,पाचाणे, चांदखेड, पुसाणे, आढले खु., आढले बु., दिवड, राजेवाडी, ओवळे, डोणे, शिवणे, पिंपळखुटे, बेबडओहोळ येथील गणेश मंडळातील गणरायांचे दर्शन घेतले.
यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल-ताशांच्या गजरात व बैलगाडीतून मिरवणूक काढून सर्वांचे स्वागत केले. मागील तीन वर्षांच्या काळात आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातुन गावांमध्ये अनेक विकास कामे झाली असल्याने नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले. व पुढील काळात विविध विकास कामांसाठी अधिक निधीची मागणी देखील केली. यावर आमदार शेळके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!