
पवना संकुलातील विद्यार्थांंचे बौध्दिक स्पर्धेत घवघवीत यश
पवनानगर :
गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर तालुकास्तरीय आंतरशालेय बौध्दिक स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थांनी विविध बौध्दिक स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.
तळेगाव येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळेमधील २७७ विद्यार्थी सहभागी झाले होते .यामध्ये एकूण सर्वाधिक ९ बक्षिसे संकुलातील विद्यार्थांंना मिळाली.
या तालुकास्तरीय बौद्धिक, स्पर्धेत निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , व पद्य पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धेत पहिली ते बारावी पर्यंतच्या गटात पवना शिक्षण संकुलातील घवघवीत यश संपादन करुन तालुक्यात देखील प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत यश मिळविणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंना संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे , पर्यवेक्षिका निला केसकर’ रोशनी मराडे, सुवर्णा काळडोके , वैशाली वराडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील बोरुडे ,शिक्षक प्रतिनिधी गणेश ठोंबरे, प्राथमिक विभाग प्रमुख गणेश साठे , कॉलेज विभागातील प्राध्यापक मोहन शिंदे यांंनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थांंचे नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी अभिनंदन केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



