
जांबवडे गावातील ठाकरवाडीवर होणार काँक्रिटचा रस्ता
इंदोरी :
जांबवडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ठाकरवाडी येथील रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी आमदार सुनिल शेळके यांनी सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून,या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक महिला व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सरपंच सौ, सारिका, अनिल घोजगे, उपसरपंच सौ, वैशाली भांगरे,मा, उपसरपंच, श्री अंकुश घोजगे, ग्रामपंचायत सदस्य श्री सोपान भांगरे , मंगेश भोसले,श्री,सागर नाटक , सौ बायडाबाई धावजी केदारी, नारायण मालपोटे, जगन्नाथ नाटक(पाटील), पांडुरंग घोजगे,(मा अध्यक्ष,तं मु) अनिल घोजगे,योगेश नाटक पाटील माणिक नाटक, शांताराम नाटक,मंगेश नाटक, सनी नाटक, , कुमार नाटक, नितिन भांगरे, मयुर नाटक, ग्रामपंचायत कर्मचारी तुषार भोसले, अजय जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


