

तळेगाव स्टेशन:
दुचाकीची सर्विसिंग,ऑईल बदली आणि वाॅशिंग फक्त सहाशे रुपयात करून देण्याची खुली ऑफर देत तळेगाव स्टेशन येथील स्वप्ननगरीतील अद्विका अॅटो पॉईंटचे उद्घाटन झाले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुलोचनाताई आवारे,पुढारी ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक निवृत्ती दाभाडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे,अद्विका अॅटो पॉईंटचे सर्वेसर्वा
ज्ञानेश्वर डांगोरे,दिपक डांगोरे,राजेंद्र कुमार भाटिया
पवन चौहान यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
यावेळी सुमित परिया रोहित राऊत,शुभम पवार,कौशल भोसले उपस्थित होते.
शहराच्या मध्यावर हे मल्टीब्रॅण्ड टू व्हिलर सर्व्हिस सेंटर आहे. या सेंटर मध्ये सर्विसिंग,फ्री पिकअप व ड्राॅप,अनुभवी इंजिनियर कडून सर्व्हिसिंग,बॅटरी,ऑईल,अॅन्युयल मेंटेनन्स सर्टिफिकेट,स्पेअर्स,ब्रेक डाऊन सर्विस अशा अनेक सुविधा उपलब्ध आहे.
दुचाकी वाहन हे प्रत्येक घरची गरज बनली आहे. मध्यमवर्गीय यांचा रोजचा प्रवास दुचाकीवरून होत आहे. शाळा महाविद्यालयात जाणारी मुले,नोकरीला जाणारे कामगार,मंडईत जाणारी गृहिणी या प्रत्येकालाच दुचाकीची गरज बनली आहे.
दुचाकीची सर्विसिंग फार महत्वाची आहे,आपल्या दुचाकीची काळजी घेऊन तिची सर्व्हिस ची जबाबदारी आम्ही घेतली असल्याचा विश्वास डांगोरे यांनी दिला.आता सणासुदीचे दिवस आहे. त्यात संपूर्ण मावळ तालुका पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. पुणे मुंबई शहरासह उपनगरांतील हजारो पर्यटक वीकेंडला मावळ तालुक्यातील लोणावळा,खंडाळा,राजमाची,लोहगड,विसापूर,तुंग,तिकोणा,आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळाची भटकंती करीत आहे. पवना,अंद्रायणी,इंद्रायणी नदीचे जलाशय आणि सह्याद्रीचे कडेपठार आणि वनराई डोळ्यात साठवत आहे. आपणालाही पर्यटनाचा मोह असला तर जाण्यापूर्वी आपल्या दुचाकीची सर्विसिंग अगदी माफक दरात करून घ्या आपल्या
अद्विका अॅटो पॉईंट मध्ये असे आवाहन डांगोरे यांनी केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



