
वडगाव मावळ:
गणेशोत्सवाची झगमगीत आरास,विद्युत रोषणाई,गणेश भक्तीची गीतांचा दणदणाट शहरात अनुभवला जातो. नेमकी याच्या विरूद्ध गत आंदर मावळातील गणेश भक्त दोन दिवसापासून अनुभवत आहे. बुधवारी सकाळी गणरायचे आगमन झाले.आणि रात्री झालेल्या अवकाळी पावसात आंदर मावळातील बत्ती गुल झाली. ती आज गुरुवारी रात्री पर्यंत बत्ती गुल होती.
महावितरणच्या दुर्लक्ष पणा मुळे आंदर मावळातील गणराया दोन दिवसापासून अंधारात आहे. गणराया उद्या तरी गावोगावची बत्ती लागून तुझ्या आरासाची झगमगाट आणि घरोघरी दिव्यांचा उजेड पडू दे अशी प्रार्थना आंदर मावळातील गणेश भक्त करीत आहे. बुधवारी रात्री आठ वाजता आंदर मावळातील पन्नास गावातील बत्ती गुल झाली ती गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत बंदच होती.
महावितरणने शुक्रवारी तरी तातडीने वीज पुरवठा नियमित पणे सुरू करावा अशी मागणी भोयरेचे सरपंच बळीराम भोईरकर यांनी केली.बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह विजेच्या लखलखाटासह मोठी पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला.वीज गायब झाल्याने घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला समईच्या उजेडात रात्र काढावी लागली.
गुरुवारी दिवस भरात वीज पुरवठा नियमित पणे सुरू होईल या भाबड्या आशेवर गणेश भक्तांनी दिवस भर वाट पाहिली पण वीज पुरवठा काही सुरू झाला नाही,त्या मुळे गणेश भक्तगणांनी तीव्र व्यक्त केले. ही नाराजी व्यक्त करताना गणेश भक्तांच्या रडारवर महावितरणचे अधिकारी,लोकप्रतिनिधी,सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. अनेकांनी यथोचित लाखोली वाहिली. महावितरणच्या गलथान कारभाराचा पंचनामा करताना आंदर मावळातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.शुक्रवारी तरी वीज पुरवठा सुरू करावा या मागणीने जोर धरला आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


