जेष्ठ सामाजिक  कार्यकर्ते रामदास बाबुराव मोढवे यांचे  निधन
वडगाव मावळ :
वडगाव नगरपंचायत हद्दीतील ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते रामदास बाबुराव मोढावे वय ६४ यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांनी संशय व्यक्त केला. माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहे.
रामदास मोढवे यांची उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि. १) सकाळी साडअकराच्या सुमारास मोजणी संदर्भात सुनावणीची तारीख होती, साडेबारा वाजता सुनावणी संपल्यावर त्यांनी चहा पिला. त्यानंतर घरी आले, त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांना काही वेळाने उलटी झाली. मोढवे यांनी झालेली उलटी जपून ठेवा व पोलिसांना द्या पुरावा म्हणून द्या, असे म्हणल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले, दुपारी ३ वाजता उपचारासाठी तळेगाव दाभाडे येथील हरणेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक निंबधक विठ्ठल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार अमोल कसबेकर, सचिन देशमुख, सागर गाडेकर आदींनी भेट दिली.
मोढवे यांनी माहिती अधिकारातून शासकीय भ्रष्टाचार बाहेर काढला, तसेच समाजातील गरीब व गरजूंना ते मदतीचा हात देत होते. त्यांच्या मृत्यूबाबत संशय असल्याचे यमुनाबाई मोढवे, महेंद्र वारिंगे, राजाराम मोढवे, जयश्री हांडे, अश्विनी भुंडे, सुमन वारींगे यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. उन्मेश गुट्टे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री ८ वा. त्यांच्यावर वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!