वडगाव मावळ:
मावळ  तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू,देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी  मागणी तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली.
यावर नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांनी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व शासकीय कार्यालयात देशाच्या राष्ट्रपती,पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री,उपुख्यमंत्री यांचे फोटो लावले जातील असे सांगितले वडगांव पोलिस स्टेशन येथे देशांचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर सोशल मिडिया च्या माध्यमातून आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तींवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी वडगाव मावळचे पोलीस निरक्षक विलास भोसले यांच्या कडे केली.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,उपसभापती शांताराम  कदम,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, सरचिटणीस मच्छिंद्र केदारी,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल  भेगडे,सोशल मिडिया संयोजक सागर  शिंदे,कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण  शिंदे,रामनाथ शेटे,क्रीडा आघाडी अध्यक्ष तुळशीराम वरींगे,अरुण कुटे,कुसगाव बू.चे सरपंच माऊली  गुंड,रवि  आंद्रे,तानाजी आंद्रे,विठ्ठल तुर्डे यांच्यासह तालु्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!