वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना योग्य प्रमाणात शिक्षक द्यावे अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मावळचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २७४ इतक्या प्राथमिक शाळा आहे. या प्राथमिक शाळांमध्ये ८५१  इतके शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहे.
मावळ तालुका शहरी आणि ग्रामीण भागात विखुरला आहे.तळेगाव व लोणावळा नगरपरिषद वगळता,आंदर मावळ,नाणे मावळ व पवन मावळासह कामशेत,इंदोरी,टाकवे बुद्रुक,पवनानगर या मोठ्या गावातील प्राथमिक शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
भौगोलिक दृष्ट्या गावगाडयात विखुरलेल्या दुर्गम भागात शिक्षक जाण्या येण्यासाठी वेळ जात असल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही.त्यात मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाणही अधिक आहे. त्याचाही परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल पाहिला तरी विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता घटली असल्याचे दिसून येत आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे,मावळ तालुक्याला पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्द करून देऊन,विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळावे.

error: Content is protected !!