पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान
८२२ विद्यार्थ्यांचा संकल्प शाडूमातीचाच गणपती बसविणार
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार  दि.२६ला  आकुर्डी  परिसरातुन पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी प्रभाकर मेरुकर यांनी ८२२ विद्यार्थ्याना पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी आकुर्डी परिसरातील नागरिकांना पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा म्हणुन आवाहन केले गणेशोत्सव सजावटीसाठी प्लॕस्टीकचा वापर टाळा,सजावटीसाठी थर्माकोलचा वापर टाळा,गणेशमुर्ती शाडूमातीचीच घ्यावी,प्लास्टर आॕफ पॕरिसचा वापर टाळा,गणेशमुर्ती शक्यतो लहान आकाराची घ्यावी,सजावटीसाठी प्लॕस्टीक फुलांचा वापर टाळा,गणेश विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करा असे आवाहन केले.
*निसर्गाचा नाश म्हणजे मानवजातीचा नाश*
*कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी*
*पर्यावरण का रखे ध्यान,तभी बनेगा देश महान*
अशा घोषणा देऊन जनजागृती केली संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका :-
काळे योगिता,शिक्षक –  मोहिते दिपाली,  कदम प्रकाश, नलावडे वर्षा,दरेकर सुलभा, कडूदेशमुख ज्योती, रोडे कविता, काकडे नीलिमा, ढोले नंदकिशोर, गायकवाड विकास
पूर्वप्राथमिक विद्यार्थी
भोसले माधवी, वाडकर गौरी बावधनकर मंजुषा, कुलकर्णी बालिका ,सोनवणे सीमा  मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष शब्बीर मुजावर,खजिनदार मनोहर कड,मिलन गायकवाड ,स्वप्निल सुतार,सतीश उघडे,विलास चोळसे,मच्छिंद्र राजगुरव आणि विद्यार्थी सहभागी झाले होते हे अभियान ३०/८/२२ पर्यंत प्रत्येक प्रभागातून राबविले जाणार आहे तसेच शाळा कॉलेज महाविद्यालयातूनही राबविले जाणार आहे.

error: Content is protected !!