पवनानगर:
पवना धरणामुळे पवनमावळाची मुख्य ओळख असुन भौगलिक दृष्ट्याडोंगर दऱ्या,ऐतिहासिक तुंग,तिकोणा व लोहगड विसापूर हे किल्ले यामुळे नवीन पर्यटन केंद म्हणुन या भागाची नवीन ओळख निर्माण झाली पवना धरणातुन मावळ तालुका व औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविली जाते परंतु याच धरणाच्या अगदी जवळच असलेल्या तिकोना ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे ऐन पावसाळ्यात पन्हाळाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे दोन वर्षापासून याबाबत पाठपुरावा करून देखिल याबाबत कार्यवाही केली नसल्याचे दिसुन येत आहे
ठाकूरसाई येथील विद्युत रोहित्रावरून तिकोणा ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला कनेक्शन देण्यात आलेले आहे. परंतु सदर विद्युत रोहित्रावर अतिरिक्त भार येत असल्याने तिकोना येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने चालत नाही. यामुळे गेली दहा दिवसांपासुन तिकोणा येथील पाणीपुरवठा बंद झाला आहे पाणी मिळत नसल्याने महिला त्रस्त आहेत तिकोणा व ठाकुरसाई या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने सदर विद्युत रोहित्राची क्षमता वाढविण्यासाठी महावितरण कार्यालयात प्रस्ताव दिला असुन याबाबत कार्यालयात जाऊन लवकरात लवकर टान्सफार्मर द्यावा अशी मागणी अनेकवेळा केली आहे परंतु कार्यालयाकडुन याची दखल अद्याप घेतलेली नाही
ठाकूरसाईचे सरपंच नारायण बोडके म्हणाले;”ठाकुरसाई ग्रामपंचायतीने येथिल विद्युत रोहित्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव महावितरणकडे दोन ते तीन वेळा दिला आहे याबाबत कार्यालयाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लवकर टान्सफार्मर द्यावा
ज्ञानदेव मोहोळ (उपसरपंच तिकोना) म्हणाले,”ठाकुरसाई येथील विद्युत रोहित्राची क्षमता कमी आहे याच कनेक्शन वरुन तिकोणा ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना चालू आहे परंतु गेली दहा दिवस पाणी न आल्याने महिलांची प्रचंड गैरसोय झाली याबाबत महावितरण कार्यालयाकडे तिकोना ग्रामपंचायत व ठाकुरसाई ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव दिले आहे यावर कार्यालयाने अद्याप कार्यवाही केलेली नाही लवकर अडचण दुर करावी
प्रदिप ठाकर (सामाजिक कार्यकर्ते) म्हणाले,”ठाकुरसाई येथील डिपी जीर्ण अवस्थेत आहे गावातील सर्व विद्युत कनेक्शन व तिकोना ग्रामपंचायतीची पाणीयोजनेचे कनेक्शन याच ठिकाणाहून असल्याने डीपीची क्षमता कमी पडते वारंवार लाईट जाते यामुळे नागरिकांना,विद्यार्थी, महिला सर्वाना याचा नाहक त्रास होतो
ताईबाई बोडके सरपंच तिकोना म्हणाल्या,”तिकोना येथील पाणीपुरवठा योजना ठाकुरसाई येथिल विद्युत रोहित्रावरून सुरु आहे सदर कनेक्शन क्षमता कमी असल्यामुळे बंद आहे महिलांची गैरसोय होत आहे.याबाबत महावितरण काय्यालयाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

error: Content is protected !!