भोयरे गाव आणि शाळांच्या  परिसरात सीसीटीव्हीची नजर
वडगाव मावळ:
कोथुर्णेतील स्वरा चांदेकरच्या हत्येने संपूर्ण मावळ तालुका हळहळला. स्वराच्या हत्येची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मावळातील गावोगावचे तरूण व लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले आहे. लेकींच्या सुरक्षिततेबाबत गावक-यांनी पाऊले टाकायला सुरुवात केली आहे.यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सीसीटीव्हीची नजर ठेवली जाणार आहे. ग्रामपंचायत भोयरे यांच्या माध्यमातून जि.प.प्राथ.शाळा व शालेय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाच्या  उद्घाटन प्रसंगी  किशोर सातकर  (अध्यक्ष- मा.ता.रा.यु.कॉ.), बळीराम भोईरकर (सरपंच-भोयरे), मंगल आडिवळे(उपसरपंच- भोयरे), रामभाऊ भोईरकर (अध्यक्ष-शा.व्य.स.भोयरे), राजाराम करवंदे-(उपाध्यक्ष शा.व्य.स.भोयरे), कृष्णा भांगरे (कें.प्र.भोयरे), रामदास वाडेकर(सरचिटणीस-मा.ता.रा.कॉं.), मंगेश आडिवळे(पो.पा.भोयरे), भारत आडिवळे(अध्यक्ष-अं.मा.यु.कॉं.),प्रमिला सुळके(ग्रामसेविका), आत्माराम मोरे सर,केदार सर,देविदास आडिवळे, बाळासाहेब आडिवळे, बळीराम आडिवळे, तानाजी खडके, बाळासाहेब भोईरकर, शुभम करवंदे, मंगेश जाधव, ज्ञानेश्वर खुरसुले,शंकर भोईरकर, गजानन भोईरकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित श्री तानाजी शिंदे सर यांनी केले.तसेच नवथळे मॅडम, गाढवे मॅडम,खुरसुले सर भोईरकर सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सरपंच बळिराम भोईरकर व ग्रामसेविका प्रमिला सुळके  म्हणाल्या,” स्वराच्या हत्येने मावळ तालुक्यातील प्रत्येक आई वडीलांचे काळीज चिरले,स्वराची हत्या अत्यंत दुर्देवी आणि खेदजनक आहे. स्वरा सारख्या अनेक लेकी गावोगावी आनंद राहत आहे. अशा लेकींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकांनी डोळ्यात तेल घालण्याची गरज आहे. हा संदेश देण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!