वडगाव मावळ:
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी ,संतश्रेष्ठ श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील नाभिक संघटनेने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात सत्यनारायण पुजेचे आयोजन केले होते.
नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी संत शिरोमणी यांना विनम्र अभिवादन करून शहरातील सर्व नाभिक व्यावसायिकांना संतसेना महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले.
यावेळी मा.जि.प. सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष राजेश मोरे आणि शहरातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!