साते:
संकल्प सामाजिक सेवा संस्थेतर्फे स्वांतत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त साते येथील जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक शाळेच्या ध्वजरोहनाच्या वेळी कु.तेजल संतोष गावडे ,कु.अजय काशिनाथ आगळमे ,कु.स्वरुपा भाऊ भुंडे आणि हर्षद राजू भालेकर या विद्यार्थ्यांना ११ वी आणि १२ वी या शैक्षणिक वर्षासाठी अब्दुल कलाम शिष्यवृत्ती देण्यात आली.
शिष्यवृत्ती देण्याचे पत्र साते गावचे  सरपंच संतोष शिंदे उपसरपंच सखाराम काळोखे ,पोलीस पाटील ज्योती मोरे,ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे,संदीप शिंदे यांच्या शुभहस्ते देण्यात आले..सदर शिष्यवृत्ती मध्ये त्या मुलामुलींचा शिक्षणाचा पूर्ण खर्च म्हणजे शालेय फि,शालेय पुस्तके ,वह्या ,शालेय गणवेश आणि जाण्या येण्याचा प्रवास खर्च  इ.खर्च  संस्था करणार आहे.
त्यावेळी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. तसेच संस्थेतर्फे सर्व मुलांना खाऊवाटप केले श्री.महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त बहुसंख्य  भाविकांना प्रसाद वाटण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे कार्याध्यक्ष वदन आगळमे उपाध्यक्ष शेखर गावडे  सचिव  मदन आगळमे सह.सचिव नितीन आवटे खजिनदार नितीन आगळमे आणि विश्वस्त दशरथ आगळमे विलास आगळमे,नवनाथ गावडे बाळू चौधरी प्रकाश भुंडे यांनी केले.

error: Content is protected !!