वडगाव मावळ:
भारत माते की जय.. वंदे मातरम..स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..च्या जयघोषाने वडगाव मावळची बाजारपेठ दुमदुमून गेली. हातात स्वातंत्र्याचा तिरंगा आणि धगधगीत मशाल घेऊन निघालेल्या मशाल मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. देशभक्तीचा ओसंडून वाहणारा उत्साह मावळ तालुक्यातील जनतेने याच डोळी याच देही अनुभवला.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वेला मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने काढलेल्या मशाल मिरवणुकीला भरभरून प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्योत्तर भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मशाल मिरवणूकीचे आयोजन राष्ट्रवादीने केले होते. आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत ही मशाल मिरवणूक काढण्यात आली होती.
विसरुन जाऊ सर्व निराशा, स्वप्न उद्याचे फुलवूया, इतिहासातून धडा घेऊनी भविष्य आपुले घडवूया.! अक्षर शिकुनी ज्ञान मिळवूनी, घडवूया नूतन सृष्टी, विज्ञानाचे पंख लावूनी, श्रद्धेला देऊ दृष्टी. ! स्वराज्य आले सुराज्य येण्या वेळ आता ना लागेल, घराघरातून देशभक्ती आणि समाजभक्ती जागेल.! स्वातंत्र्याच्या अमृत वर्षी, समाज जागृत होईल, जगात साऱ्या भारतभूचे स्थान अबाधित राहील असा धगधगता विचार घेऊन झालेली मशाल मिरवणूक मावळवासीयांच्या कायमच स्मरणात राहील.
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ही मिरवणुकी झाली.
पंचमुखी मारूती मंदिरापासून निघालेली मिरवणूक खंडोबा चौकातून,बाजारपेठ मार्गे चावडी चौकातून,पोटोबा मंदिर,चांदणी चौकातून,पंचायत समिती चौकातून गेली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या साठी केलेले उत्तम नियोजन नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना निश्चित मार्गदर्शक ठरणार आहे.
पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऊर अभिमानाने भरून येईल अशा घोषणा दिल्या,ज्या मुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले. इतिहासाच्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या शहरात याही मशाल मिरवणुकीची नोंद घेतली असा विश्वास शहरवासीयांकडून बोलून दाखवले जात आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष गणेश खांडगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी सलग तीन वर्षे देहूरोड ते लोणावळा अशी दुचाकीवरून क्रांतीज्योत रॅली यशस्वी आयोजन केले होते. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात बलिदान दिलेल्या हजारो हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे हे निमित्त होते. याच क्रांतीज्योत रॅलीत खांडगे यांनी व्यसनमुक्तीसह भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला होता. क्रांतीज्योत रॅलीतही शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाल्याच्या रॅलीची ही नोंद झाली आहे.
तब्बल बारा वर्षानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकारातून निघालेल्या यंदाच्या मशाल मिरवणुकीतून देशभक्तीचा नारा देण्यात आला.

error: Content is protected !!