नवीन समर्थ विद्यालयाचा अभिनव उपक्रम
तळेगाव दाभाडे:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवीन समर्थ विद्यालय यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, भेटकार्ड तयार करणे ,मेदी, रांगोळी स्पर्धा आणि देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा यांचे आयोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
शाळेतील एकूण ११५० विद्यार्थ्यांपैकी जवळपास 780 विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धा अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडल्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी चे अध्यक्ष रोटरीयन दीपकजी फल्ले यांना निमंत्रित करण्यात आले त्यांच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे माजी अध्यक्ष रोटरीयन संतोष शेळके, किरण ओसवाल, रोटरीयन सुरेश शेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून बक्षीस वितरण समारंभात प्रारंभ करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  ईशस्तवन सादर केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन समर्थ विद्यालय आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री संजय वंजारे यांनी केले* मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान प्रकल्प प्रमुख संतोष शेळके यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांमध्ये नवीन समर्थ विद्यालयाच्या चित्ररथ व शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांस पदक देऊन त्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आपल्या शिक्षकांचे आपल्या जीवनात असणारे स्थान आपल्या आई-वडील आणि त्यात महत्त्वाचे असते शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असंख्य उपक्रम राबवत असतात.
शाळेच्या सुसंस्कारित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. समाजात वावरण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास व नेतृत्व या शालेय जीवनातूनच आपल्याला मिळत असतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रभा काळे यांनी केले .
उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक माननीय श्री भाऊसाहेब आगळमे यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील अध्यापक श्री रेवप्पा शितोळे, श्री संजय कसाबी, सौ सविता चव्हाण सौ शारदा वाघमारे ,सौ वंदना मराठे ,सौ सोनल साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,कार्यालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

error: Content is protected !!