वडगाव  मावळ:
शहरातील पहिली मानाची  दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. श्रीमंत महादजी शिंदे अॅटो व टॅम्पो संघटनेच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते.कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आला नव्हता. यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा होत असल्याने तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला होता.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून पदयात्रा काढत मान्यवरांच्या उपस्थितीत हंडीचे पुजन करण्यात आले. यावेळी श्री महादजी रिक्षा संघटनेचे दहीहंडी उत्सव अध्यक्ष सुधीर तुमकर यांच्या वडिलांचे वृद्धपकाळाने निधन झाल्याने त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महादजी शिंदे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मा जिल्हा परिषद सभापती बाबुराव आप्पा वायकर, नायब तहसीलदार चाटे साहेब, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक चंदजीत वाघमारे, राहुल ढोरे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, उपाध्यक्ष सुरेश जांभुळकर, उद्योजक युवराज ढोरे, सिद्धेश ढोरे, रिक्षा व टॅम्पो संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, सर्व पत्रकार बांधव आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे स्नेह ग्रुप यांच्या वतीने दहीहंडी उत्सावानिमित्त शहरात येणाऱ्या सर्व गोविंद पथकांना तसेच शहरातील गोपाळ भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
यंदा महादजी शिंदे रिक्षा व टॅम्पो संघटना दहिहंडी उत्सावाचे हे ३३ वे वर्ष होते. मुंबईतील शिवशक्ती नगर गोविंद पथकाने शहरातील मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावत आनंदोत्सव साजरा केला.

error: Content is protected !!