कान्हे  रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची  प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
कान्हे फाटा:
कान्हे रेल्वे गेट नंबर 45 तांत्रिक दुरुस्तीच्या कारणाने 19 व 20  तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 06  या वेळेत दोन दिवस बंद राहणार आहे. त्या मुळे आंदर मावळ मधील प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्ग आंबळे निगडे तळेगाव  तसेच दुसऱ्या मार्गी टाकवे बुद्रुक घोणशेत कचरेवाडी साई नाणे  कामशेत या मार्गाचा पर्यायी वापर  करावा लागणार आहे.
कान्हे टाकवे बुद्रुक या मुख्य रस्त्यावरून आंदर मावळ मधील 40 ते 45 गावातील नागरिक प्रवासासाठी  या मुख्य रस्त्याचा वापर करतात. मात्र कान्हे येथील रेल्वे गेट च्या तांत्रिक कामामुळे गेट बंद राहणार असल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. जांभूळ येथे अंडरपास चे काम सुरू असल्यामुळे कान्हे फाटा येथे रेल्वे आल्यानंतर गेट बंद झाल्यावरती दोन-तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागत आहेत..
ह्या भागातून शहरी ठिकाणी जाणारे विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक अनेक नागरिक आहेत.  गेट दोन दिवस बंद  राहणार असल्यामुळे आंदर मावळ भागातील नागरिकांना 50 ते 60 किलोमीटरचा वळसा घालून शहरी भागात जावे लागणार आहे, रेल्वे प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय नागरिकांच्या हिताचे घेतले पाहिजेत अशी मागणी होत आहे.
जांभूळ येथील गेट नंबर 47 गेले वर्षभरापासून बंद आहे याठिकाणी अंडर पासचे काम सुरू आहे. वडिवळे येथील पुनरावृत्ती येथील अंडरपासची झालेली आहे.  येथील सबंधित नागरिकांनी पुणे व लोणावळा येथील रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, हे पूर्णपणे चुकीचे काम सुरू आहे मात्र प्रशासन याची दखल घेत नाही येत्या काही दिवसात काम सुरळीत सुरु झाले नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. असा इशारा माजी सरपंच संतोष जांभूळकर यांनी दिला आहे.
टाकवे बुद्रुक या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी शहरी भागातील अनेक कामगार  टाकवे  बुद्रुक येथे येत असतात, तसेच आंदर मावळ मध्ये अनेक ठिकाणी शाळा आहे, टाकवे बुद्रुक या ठिकाणी कॉलेज माध्यमिक प्राथमिक इंग्लिश मीडियम अशा अनेक शाळा आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी संबंधित नागरिकांना येण्यासाठी 70 ते 80 किलोमीटरचा वळसा घालून पोहोचावे लागणार आहे.  तसेच कान्हे येथे ओहर ब्रीज नसल्यामुळे टाकवे बुद्रुक येथील अनेक कंपन्या चाकण या ठिकाणी स्थलांतरित झाल्या असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे म्हणाले.

error: Content is protected !!