पवनानगर:
ब्राम्हणोली येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी श्री. पर्वती माणकु काळे (वय- ९२) यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले
ते प्रगतशील शेतकरी होते. शेतीमध्ये नवीन प्रयोग करत असत १९७२ च्या दुष्काळात नंतर त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तीमत्व अशी पंचक्रोशीत त्यांची ओळख होती. त्यांचे दोन मुलगे पुणे येथे व्यवसाय करत असून एक सामाजिक कार्यात सहभागी असतात.
त्याच्या पश्चात तीन मुले व दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार असून  ब्राम्हणोली गावचे माजी सरपंच व पुणे जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाचे उपाध्यक्ष मारुती काळे यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!