औदर:
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. नुकताच आपण अमृतमहोत्सव साजरा केला. राजकीय मंडळी विकासाच्या कित्येक बाता मारतात.आणि भोळीभाबडी जनता या थापांवर विश्वास ठेवतात. पण हा विश्वास किती वर्षे ठेवायचा यालाही सीमाही आहे. रोजच त्या चिखलातून,कच्च्या ओबाड धोबड रस्ता तून जाताना आमची जिंदगी गेली. आम्ही नाही पक्क्या रस्त्याने गेलो किमान आमची मुलबाळ आणि नातवंड तरी डांबरीच्या चकचकीत रस्त्याने जातील याची आम्ही वाट बघतोय अशी अपेक्षा खेड तालुक्यातील टपालवाडी ते औदर रस्त्याने रोज जाणारे ग्रामस्थ करीत आहे.
दीडशे ते दोनशे लोकसंख्या असलेल्या टपालवाडीत जायला यायला पक्का रस्ता नाही. गावक-यांना रोज याच चिखलाच्या रस्त्याने जावे यावे लागत आहे.दवाखान्यात जाणारे रूग्ण असो,शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी असो अथवा कामधंद्याला जाणारा नोकरदार व्यक्ती त्याची रोज हीच परवड सुरू आहे.
कोणाला सांगावे तर ऐकायला कोणी नाही,टपालवाडीतील कित्येक जणांनी पोटासाठी घरदार सोडून मुंबई गाठली. सणासुदीला यात्रेजत्रेला गावाला यायचं म्हटलं तरी हाच रस्ता. गावात येणारे जाणारे पाहुणे मंडळीही रस्त्याची ही अवस्था पाहून गावाकडे फिरकत नसल्याचा अनुभव गावक-यांनी घेतला आहे.
स्थानिक तरूण सागर मेदगे म्हणाले,” डांबरीकरणाने शहर ऐकामेकाशी जोडली गेली. शहरांना गावे जोडली आम्ही रोज जाता येता पाहतो पण आमच्या टपालवाडी जायला यायला चिखलाचा रस्ता आहे. शासनाने आमच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे.

error: Content is protected !!