वडगाव मावळ:
मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन २०२२ उत्साही वातावरणात संपन्न झाले.
यावेळी कॉग्रेसचे मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तज्ञ संचालक मंगेश ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, अक्षय महाराज भोसले, प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
श्री. अक्षय महाराज भोसले यांनी उपस्थितांना कौटुंबिक संस्कृती याविषयी संबोधित करताना समाज कसा घडवावा तसेच कुटुंबावर संस्कार कसे करावेत यासंबंधित विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान परिवारातील महिला भगिनी आणि मित्र परिवार कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!