कुसगाव बुद्रुक:
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावर्षी दहावी व बारावी परिक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना झेंडा फडकवण्याचा मान दिला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय येथे सई आनंद गावडे , जिल्हा परिषद शाळा कुसगाव बुद्रुक येथे तृप्ती किशोर परदेशी, जिल्हा परिषद शाळा ओळकाईवाडी येथे साहिल सुधीर मुळीक, क्रांतीनंतर अंगणवाडी येथे दक्ष पाटील अशा एकूण चार ठिकाणी चार विद्यार्थ्यांनी झेंडावंदन झाले.
हे सर्व करण्यामागे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून यशस्वी व्हावे हा उद्देश होता. यासाठी सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच श्री सूरज दत्ता केदारी, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा  अभियान राबविण्यासाठी संपूर्ण गावात २००० झेंडे वाटप करण्यात आले होते .

error: Content is protected !!