भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन
कामशेत :
मागील २ वर्षापासून रखडलेल्या कामशेत येथील रेल्वे भुयारी मार्ग कायमस्वरूपी बंद करावा व त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून उड्डाणपूल बांधण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या
जलसमाधी अंदलोनास आज बुधवारी (ता. १७) सर्वपक्षीय नेते व नागरिकांनसह विद्यार्थ्यांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून व पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कामशेत शहरातून नाणे मावळातील वडिवळे, वळक सांगीसे, बुधवडी, वेल्हवळी, नेसावी, खांडशी, उंबरवाडी या गावांना जाण्यासाठी रेल्वेच्या गेट क्रमांक 42 मधून जावे लागते पर्यटन, लघुउद्योग तसेच नोकरदार, विद्यार्थी, व्यवसायिक आदींमुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी होत असते. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असून मागील २ वर्षांपासून काम रखडल्याने त्या ऐवजी उड्डाणपूल उभारावा व कामशेत बाजारपेठेत जाणारा जुना राष्ट्रिय महामार्ग तातडीने पूर्ववत करून खुला करावा या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले होते.
यावेळी पोलीस प्रशासनाने समय सूचकता दाखवत आंदोलन ठिकाणी येणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना बॅरिगेट्स लावत अडवले व जलसमाधी घेण्यापासून रोखले.

error: Content is protected !!