
खांडशी:
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील खांडशी गावामध्ये गेली ४ ते ५ दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यांच्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खांडशी,नेसावे ही गावे डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास गाव आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.
तरी वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सरपंच नवनाथ राणे,नंदिनी शिरसट यांच्यासह अन्य सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंच राणे व उपसरपंच शिरसट यांच्यासह अन्य सदस्यांनी महावितरणच्या कार्यालयास निवेदन दिले आहे. महावितरणच्या कामशेत कार्यालयाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. अशा संबंधित अधिकान्यावर वायरमनवर योग्य तो नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


