तळेगाव स्टेशन:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पैसाफंड शाळा तळेगाव दाभाडे  शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
  गरजुमुलांसाठी  एकहात  मदतीचा हा उपक्रम हाती घेऊन गाव वाडी वस्तीवर तळागळात शेवटच्या घटका पर्यंत गरजु विध्यार्थी शिक्षणा पासुन वंचित रहात कामा नये.  म्हणुनच पैसाफंड प्राथमिक शाळा तळेगाव दाभाडे या शाळेमध्ये हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर यांच्या संकल्पनेतुन एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्येमातुन गरजु विध्यार्थी यांना दफ्तर वाटप करण्यात आले.
  यावेळी श्रीमती अनिता लादे मँडम,श्री विठ्ठल  दरेकर सर,सौ . अर्चना शेरे,श्री . अमित चिंतल,श्रीमती ज्योती दुर्गे,श्रीमती प्रिती बारमुख,सौ . शुभांगी नाळे,सौ . ज्योती डुंबरे,सौ . वैशाली मानकर मँडम व सर सर्व मान्यवर उपस्थित होते. व डुंबरे मँडम यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!