पवनानगर :पवनानगर परिसरामध्ये भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात , अनेक ठिकाणी प्रभातफेरी,विविध प्रकारच्या स्पर्धा ,शालेय साहित्य वाटप करून स्वातंत्र्य दिन संपन्न
पवनानगर परिसरामद्ये भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाने यावर्षी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा यावेळी अनेक ठिकाणी विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. येथीव पवना विद्या मंदिर शळेत स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सावा निमित्त रोंगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत संपूर्ण पवानानगर येथे रॅली काढुन जनजागृती करण्यात आली होती. यामध्ये पवनानगर परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवाभावी संस्था व लोणावळा ग्रामिणचे पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते यावेळी पवना पोलिस मदत केंद्राचे जमादार विजय गाले यांनी ध्वज कसा फडकावा याविषयी मार्गदर्शन केले.
पहिल्या (ता.१३ ) दिवसाचे ध्वजारोहणाचा मान या शैक्षणिक वर्षातील सेवानिवृत्तीमुळे पवना संकुलाच्या प्राचार्या सौ.अजली दौंडे यांना देण्यात आले त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर ध्वजाचे पूजन पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण पवना संकुलाच्या पर्यवेक्षिका निला केसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.काल ( ता.१५ ) ध्वजाचे पूजन शालेय समिती सदस्य नारायण कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर अमृत महोत्सवी ध्वजारोहण काले ग्रामपंचायत सदस्या आशा प्रविण कालेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, ग्रामपंचायत सदस्या छायाताई कालेकर, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, माजी उपसरपंच संदिप भुतडा, नितीन बुटाला, चेअरमन संतोष ठुले, महागावचे सरपंच सुभाष पडवळ, रामदास मोहोळ, सुनील बुटाला, किशोर शिर्के, संदिप बुटाला, अलताफ शेख व शाळेतील सर्व माध्यमिक विभागातील अध्यापक महादेव ढाकणे, बापुसाहेब पवार, राजकुमार वरघडे, शिक्षक प्रतिनिधी गणपत ठोंबरे, शिक्षकेतर प्रतिनिधी दिनेश काळे,छाया करडीले रोशनी मराडे, वैशाली वराडे, मंजुषा गुर्जर, सुवर्णा काळडोके, प्राध्यापक मोहन शिंदे, प्रतिभा ढमढेरे, संतोष टाकवे, संदिप शिवणेकर प्राथमिक विभाग प्रमुख गणेश साठे,कांचन जाधव, पूनम दुष्मन या तिन्ही विभागाचे सर्व शि‌क्षक व ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडे च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत ५ वी ते ७वी च्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनी पवना शिक्षण संकुलातील सानिका हनुमंत करपे व उत्तेजनार्थ पारितोषिक हर्षदा रविंद्र भालेकर प्राप्त झाले याचे बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांचा शुभहस्ते करण्यात आले तर मोरया क्रियशनच्या वतीने अक्षय शेळके, संदिप जगताप, गणेश कालेकर, विशाल साबळे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले.

error: Content is protected !!