टाकवे बुद्रुक:
माहिती आणि तंत्रज्ञानाने जग जोडले आहे. विज्ञानाने वेगवेगळे प्रयोग केले आहे. कृषी,औद्योगिकीकरण वाढले. माणूस चंद्रावर जाऊन आला आहे. वेगवेगळ्या शोधांनी नवी दालने उभी खुली झाली आहे.अंधश्रद्धेला आम्ही मूठमाती दिली असे एकीकडे म्हणतो.तर दुसरीकडे अंधश्रद्धेचे प्रकार दिसून येत आहेत. असाच अंधश्रद्धेचा प्रकार मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील  स्मशानभूमीत बुधवार दि.१७ ऑगस्टला आढळून आला.
स्मशानभूमीत आढळून आलेल्या काळी पिशव्यांनी गावभर चर्चला उधाण आले. त्याच झाले असे टाकवे  बुद्रुक येथे  स्मशान भूमी येथे दशविधी क्रिया निमित्त अनेक नागरिक उपस्थित होते. या दरम्यान, स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात बाजूला काळी पिशवी असल्याचे बाबाजी गायकवाड, नवनाथ आंबेडकर, नितीन कदम, दत्ता आमले, समीर धनवे,  दिलीप  आंबेकर, संतोष कोंडे, राजू जगताप, चिंधू जगताप यांच्या निदर्शनास आले.
  त्या  ठिकाणी काही हालचाल होताना त्यांना दिसले.काळी पिशवी आणि त्यात होणारी हालचाल चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, हा नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी  त्या ठिकाणी काही गावकरी पोहचले. ती पिशवी एका नागरिकांनी खोलून पहिली असता, त्या पिशवीत
  मध्ये  एका लिंबाला टाचण्या खोचल्या होत्या. हळदीकुंकू आंबीर लावलेले होते.
   एक काळे कोंबडीचे पिल्लू, एक काळा धागा , त्याला वेगवेगळे दातू  बांधलेले होते.नारळालावेगवेगळे रंग लावले होते.  हे पाहून नागरिकांच्या भुवया उंचावल्या अन एकच चर्चेला उधाण आले.  हा नक्की काय प्रकार आहे यावरती  अनेक चर्चा रंगल्या होत्या.

error: Content is protected !!