तळेगाव दाभाडे:
अमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगांव येथील मोहर प्रतिमा संकुलामध्ये भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.
मोहर प्रतिमा सोसायटी तळेगाव दाभाडे राव कॉलनी येथे ७५ व्या अमृतमोहत्सवी स्वातंत्र्य  दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहनचा कार्यक्रम  अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
  पोलीस नाईक गणेश शिंदे व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले.त्यानंतर बाळगोपाळांनी विविध सार्वजनिक कार्यक्रम सादर करून सर्वांची मने  जिंकली.
   रक्तदान शिबिराचे आयोजन मोहर प्रतिमा सोसायटी व पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने व गणेश भोसले यांच्या प्रयत्नातुन करण्यात आले. रक्त दान शिबिराचे उदघाटन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड सहेब यांच्या शुभ हस्ते कारण्यात आले.
   या  शिबिरामध्ये 58 रक्तदात्यांनी रक्त दान केले या सामाजिक उपक्रमामुळे मोहर प्रतिमा सोसायटीने एक सामाजिक बांधिलकी जपत आदर्श निर्माण केला  मोहर प्रतिमा सोसायटी A,B,C,D,F संकुलवासियांच्या वतीने व पदाधिकार्याच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे  स्वागत व  अभार मानण्यात आले. निखील कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!