अनसुटे:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिना निमित्त अनसुटे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडी सेविका व विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था म्हणून चटया वाटप व खाऊ वाटप श्री संतोष मोधळे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका यांच्या तर्फे करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शिक्षिका फराटे मैडम तसेच रोहीदास मोधळे,बंडु लष्करी, रामदास टाकळकर,काळुराम शिवेकर, निवृत्ती मोधळे, नवनाथ घाग, संजय जगताप, चंद्रकांत मोधळे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मनसेचे नेते संतोष मोधळे म्हणाले,” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात आनंदाने साजरा होत आहे. या आनंदोत्सव सहभागी होऊन स्वातंत्र्यदिन साजरा करताना उर्जा आणि प्रेरणा मिळाली.स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीचे स्मरण करताना ऊर अभिमानाने भरून आला.

error: Content is protected !!