
मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी वतीने “तिरंगा रॅली” मधे युवकांचा उस्फुर्त सहभाग ….
कामशेत :
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने या “अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वात मावळ तालुक्यातील सोमाटणे,तळेगाव दाभाडे,वडगाव,कामशेत भागात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संदीप काकडे व भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी अभिमन्यू शिंदे यांच्या माध्यमातून तिरंगा रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात सोमाटणे फाटा येथून स्वर्गवासी विनायक मेटे यांना आदरांजली वाहून करण्यात आली. ठिक ठिकाणी रॅलीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.कामशेत मधे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे , राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात स्वागत हर घर तिरंगा अभियान संयोजक गुलाबकाका म्हाळसकर यांनी व आभार कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले.
यावेळी स्थानिक नागरिक, देशप्रेमी,सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरीतील असंख्य युवक-युवती उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



