शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
सल्लागार पदी विलास टिळे व वसंत गराडे यांची निवड
वडगाव मावळ:
शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल दगडू ढोरे व रामदास सोपान टिळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच सल्लागार पदी विलास रामचंद्र टिळे व वसंतराव बारकू गराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिवणे विकास सोसायटीच्या मागील मासिक सभेत तज्ञ संचालक व सल्लागार यांच्या निवडीबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास सर्वानुमते मान्यता मिळाल्याने शनिवारी (दि.१३) झालेल्या मासिक सभेत तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे व रामदास टिळे तर सल्लागार पदि विलास टिळे व वसंतराव गराडे यांची बिनवरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीसाठी धनंजय एकनाथ टिळे यांनी सूचक म्हणून उपस्थित केलेल्या नावांना व्हाईस चेअरमन बाळू रसाळ यांनी अनुमोदन दिले.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन गुलाब घारे, व्हॉईस चेअरमन बाळू रसाळ, संचालक एकनाथ टिळे, शंकर देशमुख, धनंजय एकनाथ टिळे, तानाजी कारके, माधुरी संतोष पडवळ, सावित्रीबाई एकनाथ टिळे, बाळू गायकवाड तसेच शिवणे, ओझर्डे, आढे, मळवंडी ढोरे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!