कामशेत:
वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने बुधवार दिनांक १७/०८/२०२२ ला रेल्वे प्रशासन व सरकारी यंत्रणा यांचा जाहिर निषेध करण्यासाठी जल समाधी अंदोलन करण्यात येत आहे.
हा भुयारी मार्ग बंदच करण्यात यावा यासाठी जाहीर निषेध करण्याकरिता सर्वांनी बहुसंख्येने सहभागी व उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
|| आंदोलनाचा हुंकार रेल्वे प्रशासनाचा धिक्कार || || संघर्ष भुयारी मार्गाचा निषेध रेल्वे प्रशासनाचा ॥ही थीम घेऊन हे अंदोलन करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वा. पोलिस स्टेशन कामशेत या ठिकाणी एकत्रित येऊन कामशेत पोलिस स्टेशन पासुन जल समाधी स्थळापर्यंत अंदोलनकर्ते  मोर्चाने जाणार आहेत.तसेच
कृती समिती तर्फे कामशेत शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जलसमाधी ठिकाण- वाडिवळे गेट क्रं. ४२, ता. मावळ, जि. पुणे हे आहे.

error: Content is protected !!