शिवसेनेच्या वतीने तळेगावात निषेध सभेचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
येथील शहर शिवसेनेच्या वतीने कोथूर्णे गावामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव दाभाडे येथे निषेध सभा घेण्यात आले. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच चिमुकल्या मुलीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी सजग राहावे असे आवाहन शहरप्रमुख देव खरटमल यांनी केले.
यावेळी गाव विभाग शहर प्रमुख सिद्धनाथ नलावडे, कार्याध्यक्ष सतीश गरुड, महिला संघटिका रूपाली आहेर, उपशहर प्रमुख सागर जाधव, सुनिता सिंह, सीता शिवेकर, शांताराम लिंबोरे, संगीता सोनवणे, गौरव मराठे, कैलास सगळे, दशरथ पुजारी, पांडुरंग पाटील, आबासाहेब अळगडे, दिलीप दळवी, वसंत ठाकरे, संदेश दातीर, गौरव शिंदे, समीर, स्वाती शेळके राजेंद्र शेळके, महिला भगिनी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!