संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत
पिंपरी:
भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पंजाब मधील भारत पाकिस्थानच्या आटारी (वाघाबॉर्डर) बॉर्डरवरील ७५  सैनिकांना राख्या बांधुन रक्षाबंधन सण साजरा सण साजरा केला.
महाराष्ट्रातील नाशिक औरंगाबाद सोलापूर पुणे सातारा या जिल्ह्यातील ७५ महिला ७५ राख्या व ७५ झेंडे घेऊन गुरुवार  दि,११/८/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ .या  वेळेत रक्षाबंधन वैशिष्ट्यपुर्ण  असे झाले*मराठी अभिनेत्री रुपाली पाथरे सहभागी आहेत.हे दुसरे वर्ष आहे यासाठी महिला सभासदांनी एकसारख्या साड्या त्यावर लागणारे साहित्य खरेदी केले आहे.
याची तयारी ४ महिन्यापासून चालु होती याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड मनोहर कड प्रिया पुजारी सायली सुर्वे आनंद पुजारी  दत्तात्रय देवकर भारती कदम आनंद पाथरे यांनी केले.
या उपक्रमात सातारा पुणे चिपळून रत्नागिरी उरण ठाणे शहापुर पनवेल या ठिकाणाहून ७५ महिला सहभागी झाले होते.

error: Content is protected !!