कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण
वडगाव मावळ:
तालुक्यातील कोथुर्णे गावात घडलेल्या अल्पवयीन बालिका अत्याचार व हत्या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशी ची शिक्षा द्या तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवत तात्काळ न्याय द्या या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मावळ च्या वतीने पवनानगर चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र चित्रा वाघ यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी हे उपोषण सोडण्यात आले. राज्यभरातून या उपोषणाला विविध संघटना, ग्रुप, परिसरातील ग्रामपंचायती, विविध राजकीय पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, कैलास गायकवाड, किरण राक्षे, निकिता घोटकुले, अलका धानिवले, अमित भेगडे, अशोक रजिवडे, महेंद्र असवले, गणेश सावंत, बबलू कालेकर, अमित कुंभार, जयवंत घारे प्रशांत ठाकर, सुनिल ढोरे, बाळा खांडभोर, संतोष भिकोले, विश्वास दळवी, नितीन आडकर यांच्या सह मोठ्या प्रमाणत महिला वर्ग उपोषण स्थळी उपस्थित होते. या उपोषणाला वारकरी संप्रदाय, क्षितिज ग्रुप, माहिती अधिकार, महिंद्रा कामगार मित्र परिवार, संकुल मित्र परिवार, व्यापारी मित्र मंडळ, विठ्ठल परिवार मावळ, मी मावळा प्रतिष्ठान हिरकणी महिला संघ, विविध ग्रामपंचाती, विविध राजकीय पक्ष आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
*चित्रा वाघ यांच्या आश्वासना नतर बजरंग दलाचे उपोषण सुटले*
या उपोषणाला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भेट दिली. बजरंग दलाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले व उद्या बाळा भेगडे व मी बजरंग दलाचे शिष्ट मंडळ घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याची भेट घेणार आहे. हे आश्वासन दिल्या नंतर दुर्गा वहिनीला पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी बोलताना चित्रा वाघ या बोलल्या की, नराधमाला फाशी होतं नाही तो पर्यंत शांत बसणार नाही विधानसभेत कडक कायदा करण्याची मागणी त्यांनी केली.
*बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या*
1) नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी
2) खटला फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावा
3) पीडित कुटुंबाचे पूर्णवसन करावे
4) विशेष सरकारी वकील नियुक्त करावा
5) विधान सभेत विशेष अधिवेशन बोलावून लैंगिक शोषण प्रतिबंधक कडक कायदा करावा
6) शाळा आणि कॉलेज परिसरात महिला पोलीस कर्मचारी नेमावा.

error: Content is protected !!