वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील कोथुर्णे या गावात अल्पवयीन मुलीसोबत घडलेला प्रसंग अतिशय चिड आणणारा व अशोभनीय आहे. अशा घटना कोठेही घडू नयेत याकरिता सर्व खासदारांनी संसदेमध्ये कडक कायदा करावी व त्याची प्रभावी अंमलबजावणी करावे अशी भूमिका माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.
कोथुर्णे गावातील मयत मुलीला लोणावळ्यात सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात पाच दिवसापुर्वी गावातील एका नराधम तरुणांने सात वर्षीय बालिकेचे अपहरण करून तीच्यावर अत्याचार केले नंतर निर्दयीपणे तीचा गळा चिरून मृतदेह शाळेचे मागे फेकून दिला. हा सर्व प्रकार अतिशय चिड आणणारा व वेदनादायी आहे. अशा आरोपींना कडक शासन करणे व त्यासाठी कडक कायदा करणे गरजेचे आहे.
देशातील सर्व खासदारांनी संसदेत महिला अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा अशी अपेक्षा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी राजेंनी यावेळी केली.

error: Content is protected !!