उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्काराने माणिक साबळे सन्मानित
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यातील मंडल अधिकारी माणिक साबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी त्यांना सन्मानित केले.
महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात नेत्र दीपक कामगिरी बजावणाऱ्या व कायदा सुव्यवस्था नैसर्गिक आपत्ती मदत व पुनर्वसन महसूल वसुली निवडणुका तसेच प्रशासन आधी जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडित क्षेत्रामध्ये निसृहवृत्तीने काम करून शासनाची जनसामान्यातील प्रतिमा उंचवल्याबद्दल माणिक साबळे यांना सन्मानित करण्यात आले महसूल दिनाच्या औचित्य साधक जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी माणिक साबळे यांना सन्मानित केले.
मावळ तालुक्यातील करंजगाव येथील मूळ रहिवासी असणारे माणिक साबळे हे नेहमीच समाज उपयोगी कार्यासाठी चर्चेत असतात महसूल विभागात काम करताना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी साबळे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे त्यांना मिळालेल्या या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!