नेरळ-काशळे-भीमाशंकर घाटाच्या कामासाठी निधी द्या’
वडगाव मावळ:
मावळ लोकसभा मतदारसंघातील नेरळ – काशळे – भीमाशंकर दरम्यानच्या घाटासाठी निधीची कमतरता आहे.या कामासाठी मध्यवर्ती रस्त्याची योजना (CRF) अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सरकारकडे केली.
याबाबत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले.त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की,  नेरळ, काशळे मावळ लोकसभा मतदारसंघात आहे.कर्जत तालुक्यात भीमाशंकर घाट मार्ग 103 वर्ग 84/930 ते 90/381 आहे.या राजमार्गाची तातडीने निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागाकडून पत्र मिळाले आहे.
भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक पवित्र तीर्थ स्थान आहे. भीमाशंकर अभयारण्य आयुर्वेदिक आणि हर्बल कार्याचे एक प्रमुख केंद्र आहे. श्रावणात मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकरला येतात. भीमाशंकरला येण्यासाठी कल्याण – माळशेज – नारायणगाव – मंचर आणि पनवेल – खंडाळा – लोणावळा – चाकण हा मार्ग आहे.भीमाशंकरला जाण्यासाठी दोन मार्ग करणे आवश्यक आहे.
मुंबई, उरण, पनवेल या भागातील भाविकांना भीमाशंकरला जाण्यासाठी कर्जत – नेरळ – कशाळे असा मार्ग तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे भीमाशंकरला जाण्यासाठीचे 53 किलोमीटर अंतर कमी होईल. या मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.वन विभागाच्या सीमा 8 ते 9 वर्गाच्या आत आहे.या कामासाठी निधी कमी पडत आहे.त्यामुळे मध्यवर्ती रस्त्याची योजना (CRF) अंतर्गत या कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी द्यावा. जेणेकरुन या मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होईल, असा खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!