त्या नराधमास फाशीची शिक्षा द्या
किशोर आवारे यांची मागणी
तळेगाव स्टेशन:
माणुसकीला काळीमा फासणारी घटना कोथुर्णे मावळ येथे घडली असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी त्या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली आहे
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आरोपीला व आरोपीला मदत करणाऱ्या इतर संशयीत  आरोपींना त्वरित अटक करून फास्टट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
मोठ्या प्रमाणात जनसेवा विकास समितीचे कार्यकर्ते तसेच तळेगाव शहरातील स्त्री वर्गाने सदर धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला होता. सदर धरणे आंदोलनादरम्यान तहसीलदार मधुसूदन बर्गे साहेब यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यात आली. सदर घडलेली घटना ही निंदनीय असून संतांची व शूरवीरांची भूमी असणाऱ्या मावळ तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी घटना घडल्यामुळे तालुक्यावरती दुःखाचे सावट निर्माण झाले आहे.
सदर आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे यावेळी किशोर आवारे यांनी नमूद केले. तहसीलदार बर्गे साहेब यांना निवेदन देऊन सर्व कार्यकर्त्यांनी व कोथूर्णे गावात जाऊन पीडीतेच्या कुटुंबीयांची व गावकऱ्यांची भेट घेतली .गावामध्ये वातावरण प्रक्षोभक असल्यामुळे गावकऱ्यांनी संयम ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन किशोर आवारे यांनी केले. तसेच मावळ तालुक्यातील पोलीस प्रशासनाने सदर गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
यावेळी  जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक किशोर भेगडे, निखिल भगत, सुनील कारंडे, सुनील उर्फ मुन्ना मोरे, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, नगरसेविका अनिता पवार, संगीता दुबे, व इतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

error: Content is protected !!