
स्वराला न्याय द्या: पवनानगर येथे शालेय विद्यार्थी उतरले रस्त्यावर
पवनानगर:
स्वराला न्याय द्या, नराधामाला फाशी द्या अशा घोषणा देत पवनानगर येथे विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. आज शुक्रवार (ता.५ रोजी ) पवना विद्या मंदिर, पवनानगर , संकल्प इंग्लिश मिडीयम स्कुल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसह गावातील संतप्त नागरिकांनी नराधामाला फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान, पवनानगर येथील ग्रामसचिवालय ते बाजारपेठ विद्यार्थ्यांनी रॅली काढून व काळ्या फीती लावून निषेध मोर्चा काढण्यात आला
कोथुर्णे गावातून मंगळवार (ता. २) रोजी बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय बालिकेचा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागे निर्जनस्थळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. सदर धक्कादायक घटनेचा मावळ तालुक्यात संताप व्यक्त होत असून आज सकाळी पवनानगर येथील तिन्ही शाळांनी येथे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या घटनेचा निषेध तिन्ही शाळांतील चिमुकल्यांनी गावातून निषेध मोर्चा काढून ‘स्वराला न्याय द्या, नराधामाला फाशी द्या’ आशा घोषणा दिल्या.
यावेळी काले पवनानगर ग्रामपंचायतीचे सरपंच खंडु कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, शाळेचे प्राचार्य अंजली दौंडे,संजय मोहोळ, हनुमंत गोणते, व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष सजन बोहरा, विलास छाजेड, ग्रामपंचायत सदस्य रमेश कालेकर, राहूल मोहोळ मुख्याध्यापिका अंजली दौंडे, मुख्याध्यापक राहुल सोनवणे, सतिश रुपनवर , अतुल कालेकर, सचिन मोहिते, भाऊ मोरे, विकास कालेकर यांच्यसह पालक व व्यापारी पदाधिकारी महिला सदस्या, विविध प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने निषेध करण्यासाठी सहभागी झाले होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


