तळेगाव दाभाडे:
स्वरा चांदेकर या सात वर्षीय बालिकेचे अपहरण, अत्याचार व निर्घृण खुनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा क्रांती चौकात जायंट्स गृप ऑफ तळेगांव दाभाडे, जायंट्स गृप ऑफ मावळ सखी, जागरूक वाचक कट्टा ,आदर्श रिक्षा संघ आणि शहरातील नागरिक यांनी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.
मूक मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करून आरोपीला भर चौकात फाशी द्यावे अशी मागणी केली.पोलीस बंदोबस्त चोख ठेऊन पोलिसांनी सहकार्य केले. महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता.महिलांनी संताप व्यक्त करून आपआपल्या बलिकांची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

error: Content is protected !!