मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामशेत येथील पोलिस चौकीला निवेदन
कामशेत:
मावळ तालुक्यातील कोथूर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे  अपहरण करून, तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली,या नराधामास फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी मानव विकास परिषदेने केली.
कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.  कोथुर्णे  येथे निरागस बालिकेवर अमानुष अत्याचार करून हत्या केली गेली या घटनेचा आम्ही  विकास परिषद महाराष्ट्र राज्य तीव्र निषेध करतो आणि हे निर्दयी, अमानुष कृत्य  करणारा नराधम त्याच गावातील तेजस महिपती दळवी नामक राक्षसी इसमास त्वरित फाशीची शिक्षा होणेसाठी आपण त्वरित पाऊले उचलावीत जेणेकरून परत कोणी असे राक्षसी कृत्य करण्यास धजावणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आपण शासकीय अधिकारी या नात्याने ज्या नराधमाने हे कृत्य केलं आहे त्याला कठोर शासन झाल पाहिजेल  तसेच यापुढे असे घटना घडू नये त्यामुळे शासनाद्वारे कडक निर्बंध करण्यात यावे हे आपणास मानव विकास परिषद पदाधिकारी नात्याने आम्ही आपणास विनंती करत आहे आपण अधिकारी या  नात्याने घडलेल्या घटनेची सकल चौकशी करून कारवाई करावी
महाराष्ट्र  प्रदेश कायदेशीर सल्लागार अॅड – जोसेफ फर्नाडिस, मावळ तालुका उपाध्यक्ष – चंद्रकांत असवले.
दरम्यान  चांदेकर या पिडीत कुटुंबाला मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक चौधरी, राष्ट्रीय खजिनदार आलिम सय्यद व जिल्हा उपाध्यक्ष उत्तम सुर्यवंशी , अंजना कदम उपस्थित होते.  मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी त्या कुटुंबाला विश्वास दिला आहे की  जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल  त्या पद्धतीने पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व लढू असे आश्वासन  मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेकडून पीडित कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

error: Content is protected !!