
वडगाव मावळ:
स्वरा जनार्दन चांदेकर हिच्या दुर्दैवी मृत्यूस जबाबदार असलेल्या नराधमाचे वडगांव मावळ मधील वकील वकीलपत्र घेणार नसल्याचा ठराव बार असोसिएशनने एक मताने मंजूर केला.स्वराला श्रद्धांजली वाहण्यासाठी बार असोसिएशनने शोक सभा घेतली.
या शोकसभेत वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे आरोपीचा जाहीर निषेध करण्यात आले. स्वरा जनार्दन चांदेकर हिचे दि. ०३ ऑगस्ट २०२२ रोजी दुर्दैवी असे निधन झालेले आहे. झालेली घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. सदरील गुन्हयातील आरोपी याचे वकीलपत्र वडगाव मावळ मधील कोणतेही वकील घेणार नसले बाबतचा ठराव एकमताने मंजुर केलेला आहे.
वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मच्छिंद्र घोजगे,अविनाश पवार,हेमंत वाडेकर,सुधा डिमळे,शैलेंद्र घारे,निवेदिताजैन,प्रशांत दाभाडे, अजय घोजगे, निलेश हांडे धनेश पटेकर, बबिता टकले , रुबिया तांबोळी यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन



