स्वराला न्याय द्या, नराधामाला फाशी , द्या; टाकवे बुद्रुक येथे निषेध मोर्चा..
टाकवे बुद्रुक :
स्वराला न्याय द्या, नराधामाला फाशी द्या अशा घोषणा देत टाकवे बुद्रुक येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. आज गुरुवार (दि. ४) रोजी बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चिमुकल्यांसह गावातील संतप्त नागरिकांनी नराधामाला फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान, टाकवे बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
कोथुर्णे (ता. मावळ) गावातून मंगळवार (दि. २) रोजी बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय बालिकेचा गावातील जि. प. शाळेच्या मागे निर्जनस्थळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. सदर धक्कादायक घटनेचा मावळ तालुक्यात संताप व्यक्त होत असून आज सकाळी टाकवे बुद्रुक येथे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या घटनेचा निषेध करण्यासाठी बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चिमुकल्यांनी गावातून निषेध मोर्चा काढून ‘स्वराला न्याय द्या, नराधामाला फाशी द्या’ आशा घोषणा दिल्या. यावेळी टाकवे व्यापारी असोसिएशनचे सभासद, टाकवे ग्रामपंचायत पदाधिकारी महिला सदस्या, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व टाकवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने निषेध करण्यासाठी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!