कामशेत :
दोन दिवसापूर्वी कोथुर्णेत घराच्या परिसरात खेळणारी सात वर्षीय  मुलगी हरवल्याचे सोशल मीडियावर शेअर झाले. अन काल तिचा मृतदेह सापडला या घटनेने मावळ तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील पवनानगर,कामशेत,टाकवे बुद्रुक बाजारपेठ बंदची हक्क दिली. यास भरभरून प्रतिसाद देत नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या.
कोथुर्णे तील या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-यास जेरबंद करण्यात आले. कामशेत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११७ / २०२२ भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली. त्या आरोपीला फाशीची सजा अशी मागणी मावळ तालुक्यातील समस्त महिला वर्गातून होत आहे. मावळ तालुक्या सारख्या सामजिक बांधिलकी मानणा-या संस्कृत तालुक्यात अशी घटना दुर्देवी असल्याचे माजी उपसरपंच अश्विनी असवले म्हणाल्या.
चंद्रभागा लक्ष्मण कुटे म्हणाल्या,”
कोणी सुरक्षित नाही वृद्ध महिला, तरुण पोरी, ना लहान चिमुकली. बलात्कार होईल या भीतीने मुलींना जन्माला घालायचे की नाही …. त्यात चिमुकलीचा काय दोष?? नीच प्रवृत्तीचा मेणबत्त्या पेटवण्याची दिवस गेले आता. या राक्षसाला फाशीची शिक्षा झालीच  पाहिजे.
सुरेखा जाधव (सामाजिक कार्यकर्त्या) म्हणाल्या,”
टाकवे बुद्रुक.अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे तरच  बाकीचे सुधारतील आणि अशा घटना घडणार नाहीत
संतोषी खांडभोर (माजी  सरपंच) म्हणाल्या,”  दोन दिवसापूर्वी एक मुलगी हरवली आहे अशी बातमी सोशल मीडिया वर फिरत होती बातमी वाचून वाटल असेल कुठंतरी, पण लगेच बातमी तिचा दुर्दैवी मुर्त्यू झाला. बातमी वाचून मन सुन्न झालं आणि खूप राग संताप झाला न कळत दोन चार शिव्या तोंडातून निघून गेल्या, ह्या गोष्टी शहर ठिकाणी होत होत्या परंतु आता ह्या खेडेगावात होऊ लागल्यात याचा विचार सर्व क्षेत्रातील लोकांनी केला पाहिजे नुसत्या शिव्या देऊन, मेणबत्ती पेटवून निषेध करून उपयोग नाही यावर प्रशासनानी ठोस ती कारवाई व उपाय योजना करावीत,

error: Content is protected !!